VIDEO | ..तर एमआयएम वंचित आघाडीतून बाहेर पडेल | असदुद्दीन ओवेसी | नांदेड | एबीपी माझा
काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एमआयएम नको असेल, तर वंचित बहुजन विकास आघाडीतून एमआयएम बाहेर पडायला तयार आहे, असं मत एमआयएमचे खासदार असदुद्दीनं ओवैसी यांनी व्यक्त केलं. काल नांदेडमध्ये प्रकाश आंबेडकर आणि ओवैसी यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन विकास आघाडीची सभा झाली. एमआयएमला एकही जागा नको, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या अटी मान्य करुन महाआघाडी उभारा असं आवाहनही त्यांनी केलं.