ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईतील हायवेवरील खड्डे बुजवणाऱ्या मुश्ताक अन्सारी यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
पावसाळा सुरू झाला की मुंबईकरांना आणि किंबहुना राज्यातल्या जनतेला धडकी भरते ती खड्डेमय रसत्यांमुळे. गल्लीतले रस्ते असोत, किंवा महामार्ग खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण ही नित्याची बनली आहे. मुंबईतल्या खड्ड्यांची परिस्थिती तर दिवसेंदिवस अतिशय भयानक होत आहे. मुंबईतल्या खड्ड्यांकडे पालिका आणि राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी विविध राजकीय पक्ष अनेखी आंदोलनंही करत आहेत आणि राजकीय पोळी भाजत आहेत. पण सरकार आणि पालिका प्रशासनाला मात्र हे खड्डे दिसतच नाहीत.
दरवर्षी या खड्ड्यामुळे अपघात होतात, काहींचे जीवही जातात. दरम्यान मुंबई आणि दिल्लीतल्या खड्ड्यांवरुन सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारला झापलं आणि खड्ड्यांची माहिती कोर्टात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पण कोणत्याही सरकारी व्यवस्थेवर अवलंबून न राहता दोन मुंबईकरांनी आता स्वतः खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे. मुश्ताक अन्सारी आणि इरफान माचिसवाला या दोघांनी मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावरील माहीम ते बांद्रा या परिसरातले खड्डे बुजवले आहेत.
या दोघांचा यामागचा हेतु काय, त्यांना सरकारची साथ मिळते का, या मोहिमेदरम्यानचा त्यांचा अनुभव काय होता हे जाणुन घेण्यासाठी आज मुश्ताक अंसारी आपल्यासोबत आहेत