ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : पश्चिम रेल्वेवर तब्बल 12 एक्स्प्रेस गाड्यांचा खोळंबा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नालासोपारा ते विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. बोरिवली ते विरार दरम्यानची वाहतूक ठप्प झालीय. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरु आहे. मुसळधार पावसामुळे नाला सोपारा ते विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. परिणामी लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रकही यामुळे कोलमडले आहे. एसी लोकल सेवाही बंद करण्यात आलीय.