ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत 225 ठिकाणी पावसाळ्यात पाणी तुंबणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुढच्या महिनाभरात पावसाला सुरुवात होईल आणि उकाड्यानं हैराण झालेल्या सामान्य मुंबईकर सुटकेचा निश्वास सोडेल. मात्र, त्याचा हा आनंद किती काळ टिकेल, हे सांगता येत नाही. कारण, मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई होणार असल्याचं समोर आलं आहे. पाऊस चांगला झाला तर यंदाही मुंबईत ठिकठिकाणी पाणी तुंबणार असल्याचं या सर्वेक्षणात म्हटलं आहे. महत्वाचं म्हणजे गेल्यावर्षाच्या तुलनेत पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये यंदा 225 ने वाढ होणार आहे.