ब्रेकफास्ट न्यूज: मुंबई: वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची सपत्नीक विठ्ठलपूजा
पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा सुरु असतानाच इकडे मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची सपत्नीक पूजा केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन काही आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात जाण्याचं टाळलं. विठ्ठलाच्या कृपेनंच आपण हेलिकॉप्टर अपघातातून बचावल्याचं ट्विटही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.