ब्रेकफास्ट न्यूज: मुंबई: मुलाचा संशयास्पद मृत्यू, नातेवाईकांची शीव रुग्णालयाबाहेर तोडफोड
Continues below advertisement
रुग्णाचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या कारणातून रुग्णाच्या नातेवाईकांनी रविवारी शीव रुग्णालयाबाहेरच्या गाड्यांची तोडफोड केली. तोडफोडीत पोलीस आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे एकूण 10 जवान जखमी झाले. यात पोलिसांच्या चार वाहनांसह काही खासगी वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी शीव पोलीस ठाण्यात सुमारे शंभरहून अधिक जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
Continues below advertisement