ब्रेकफास्ट न्यूज : सफाई कामगार हरिश्चंद्र धिवारांमध्ये दडलेला कवी
Continues below advertisement
मुंबईत एका कवीसाठी कविता ही लिहिण्याची नव्हे तर जगण्याची गोष्ट आहे. दहावीपर्यंत शिकलेले आणि मुंबई महापालिकेच्या कचरा गाडीवर कचरा वेचण्याचं काम करणारे सफाई कामगार हरिश्चंद्र धिवार यांना कविता सुचू लागल्या, त्याच मुळी घरोघरचा, गल्लोगल्लीचा कचरा साफ करताना. ढसाळ, सुर्वे यांच्याच वाटेनं पुढे जात कविता जगणारे हरिश्चंद्र धिवार आज ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आले आहेत.
Continues below advertisement