ब्रेकफास्ट न्यूज | HDFC चे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवींची हत्या व्यावसायिक ईर्षेतून
गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेले एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी सिद्धार्थ संघवी यांची हत्या झाल्याचं आता उघड झालं आहे. आणि संघवींचा मृतदेह हाजीमलंग रोडच्या काकडवाल गावाजवळ सापडला आहे. सकाळी पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. रस्त्याच्या कडेला कुजलेला अवस्थेत मृतदेह होता. त्याआधी या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. तर चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अटक करण्यात आलेल्या आरोपीनं हत्येची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर या प्रकरणात अजून काही आरोपींचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.