ब्रेकफास्ट न्यूज : मुलुंडमधील महिलेला तुर्कीतल्या हॉटेलमध्ये डांबून ठेवलं!
Continues below advertisement
मुलुंडमधील एका महिलेला तुर्कीतल्या हॉटेलमध्ये डांबून ठेवल्याचा आरोप केला आहे. 59 वर्षीय रेणु नरुला या युरोप टूरवर सुट्टीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यावर इस्तांबूल विमानतळावरील एका दुकानातून गॉगल चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच आरोपामुळे त्यांना स्थानिक कोर्टाने हॉटेल सोडण्यास मनाई केली आहे. मात्र रेणु यांनी हे सारे आरोप नाकारले आहेत. त्यांना सोडवण्यासाठी त्यांचे जावई इस्तांबूलमध्ये दाखल झाले आहेत. तर मुलीने परराष्ट्र मंत्रालय आणि तुर्कीतील भारतीय दूतावासाकडे याप्रकरणी मदत मागितली आहे.
Continues below advertisement