ब्रेकफास्ट न्यूज : पुढच्या काही तासात मान्सून केरळात दाखल होणार
Continues below advertisement
पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे. मान्सून केरळात दाखल झाल्याची माहिती स्कायमेट या खाजगी हवामान संस्थेने दिली आहे. दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जूनला धडकतो. मात्र, यंदा दोन ते तीन दिवस आधीच केरळात दाखल झालाय. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर पुढील 24 तासात त्याची वाटचाल दक्षिण-अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्वीप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालची खाडीचा परिसरात होते.
Continues below advertisement