ब्रेकफास्ट न्यूज : यूजीसीऐवजी उच्च शिक्षण आयोग नेमण्यात येणार
Continues below advertisement
युजीसी बंद करुन त्याऐवजी उच्च शिक्षण आयोग नेमण्याच्या हालचाली सरकारी पातळीवर सुरु आहेत. उच्च शिक्षण आयोग अधिनियम २०१८ नुसार याची निर्मिती करण्यात य़ेणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं यासंबंधीचा मसुदा तयार केला आहे. तो वेबसाईटवर अपलोडही केला आहे. सर्वसामान्य लोकांना ७ जुलैपर्यंत यावर ऑनलाईन प्रतिक्रिया देता येणार आहेत. इंस्पेक्टर राज संपवण्यासाठी हा नवा कायदा आणल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यात शैक्षणिक संस्थांचं मुल्यांकन करणं, शिक्षकांना प्रशिक्षण देणं, शैक्षणिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणं आणि शैक्षणिक मानकांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात आला आहे.
Continues below advertisement