ब्रेकफास्ट न्यूज : कल्याण, डोंबिवली परिसरात हादरे, रायगडमध्ये 2.8 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के
Continues below advertisement
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडीमध्ये काल हादरे जाणवले. तर तिकडे रायगडमध्ये २.८ रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के झाल्याचं आयएमडीने स्पष्ट केलं आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक बसलेल्या हादऱ्यांमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र हे हादरे कशाचे आहेत? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच प्रशासनाकडूनही याबाबत कोणताही दुजोरा देण्यात आला नाही.
Continues below advertisement