ब्रेकफास्ट न्यूज : अमेरिकेतील उपचारानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गोव्यात परतले
Continues below advertisement
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर अमेरिकेत उपचार घेतल्यानंतर तीन महिन्यांनी आज गोव्यात दाखल झाले आहेत. अमेरिकेत त्यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून, त्यांची प्रकृतीही सुधारली आहे. पर्रिकरांच्या परतण्यानं गोवा भाजपा आणि मंत्रिमंडळात उत्साह संचारला आहे. पर्रिकर यांना स्वादुपिंडाच्या विकारामुळे फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी पंतप्रधान मोदी पर्रिकरांना भेटण्यासाठी मुंबईत आले होते. तेव्हा पुढील उपचारासाठी अमेरिकेत जाण्याचा सल्ला पंतप्रधानांनीच दिला होता. त्यानंतर 7 मार्चला पर्रिकर उपचारासाठी अमेरिकेला रवाना झाले होते. तिथं यशस्वी उपचार घेतल्यानंतर आज पर्रिकर गोव्यात दाखल झाले. लवकरच ते मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना भेटणार आहेत.
Continues below advertisement