ब्रेकफास्ट न्यूज : पुण्यातील मदरशात मुलांचं लैंगिक शोषण, मौलवीला बेड्या
Continues below advertisement
पुण्यातील कात्रज परिसरातील एका मदरशातील दोन मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मौलवीला अटक करण्यात आली आहे. मौलाना रहीम असं मौलवीचं नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. याच मौलवीनं मदरशातील अन्य 25-30 मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दोन मुलं या मदरशातून पळून गेले होते. त्यावेळी त्यांनी मौलवी अन्य मुलांचं लैंगिक शोषण करत असल्याने पळाल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, पोलिसांनी मौलाना रहीम (21) याला शुक्रवारी संध्याकाळी अटक केली. याप्रकरणी बालअधिकार कार्यकर्ते डॉ. यामिनी आदबे यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी केली आणि मदरशातून मौलवीला अटक केली. इतकंच नाही तर पोलिसांनी या मदरशातून 36 मुलांची सुटका केली.
Continues below advertisement