ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : लोअर परळचा धोकादायक पूल अखेर पादचाऱ्यांसाठी खुला
लोअर परळचा धोकादायक पूल अखेर पादचाऱ्यांसाठी खुला करण्यात आलाय. काहीक्षणापूर्वी हा पूल सुरु करण्यात आलाय. हा पूल बंद केल्यापासून नोकरदारांसह व्यावसायिकांची प्रचंड कोंडी होत होती. त्यामुळे एकादी अनुचित घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता पूल सुरु झाल्याने चाकरमान्यांची गर्दीच्या कोंडीतून सुटक होणार आहे.