ब्रेकफास्ट न्यूज : लोणावळ्यातील भुशी डॅम वीकेंडला संध्याकाळी बंद
शनिवार आणि रविवारी भुशी धरणाकडे जाणारा मार्ग संध्याकाळी पाचनंतर बंद करण्यात येणार आहे. तसा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतल्याची माहिती लोणावळा उपविभागीय पोलिस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी दिली आहे. भुशी धरण आणि लायन्स पॉईंट या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. विकेंडला या मार्गावर पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लागतात. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.