ब्रेकफास्ट न्यूज : लातूरमधील पाचही आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी

Continues below advertisement
लातूरमधल्या स्टेप बाय स्टेप या क्लासच्या चालकावर गोळ्या झाडणारा करण सिंह हा कॅबिनेटमंत्री संभाजी निलंगेकर यांचा सुरक्षारक्षक असल्याचं समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे. या निमित्तानं राजकारणी आणि गुन्हेगारी यांच्या अभद्र युतीवर आता मराठवाड्यात चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान या प्रकरणी पाचही आरोपींना न्यायालयाने त्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी मध्यरात्री अविनाश चव्हाण यांच्यावर करण सिंहने गोळ्या झाडल्या. अविनाश यांचा भागीदार चंदनकुमार यानेच अविनाश यांची सुपारी दिल्याचं नंतर उघड झालं. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram