ब्रेकफास्ट न्यूज : लातूर : क्लास संचालकावर गोळ्या झाडणारा निलंगेकरांचा माजी सुरक्षारक्षक
Continues below advertisement
लातूरमध्ये 'स्टेप बाय स्टेप' या क्लासच्या संचालकावर गोळ्या झाडणारा आरोपी चक्क मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक असल्याचं समोर आलं आहे. या बातमीमुळे अवघ्या मराठवाड्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी क्लास संचालक अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात ज्या पाच जणांना अटक केली आहे, त्यात कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा माजी सुरक्षारक्षक करण सिंह याचा समावेश असल्याचं समोर आलं आहे.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि व्हॉट्सअॅपवर संभाजी पाटील निलंगेकर आणि करण सिंह यांच्या घनिष्ट संबंधांचे पुरावे देणारे फोटो अवघ्या महाराष्ट्रात फिरु लागले. त्यामुळे मंत्र्यांचा माजी सुरक्षारक्षक हा सुपारी किलर आहे का, असे प्रश्न विचारले जात आहेत.
संभाजी पाटील निलंगेकर हे लातुरातील निलंग्यातून भाजपचे आमदार असून त्यांच्याकडे कामगार कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे.