ABP News

ब्रेकफास्ट न्यूज : कोल्हापुरात अवघ्या एक दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार!

Continues below advertisement
अवघ्या एका दिवसात तुम्हाला वाहन परवाना अर्थात लायसन्स मिळेल... आश्चर्य वाटलं ना... पण हे खरं आहे... कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने झिरो पेंडन्सी उपक्रम राबवत एका दिवसात वाहन परवाना दिला जात आहे. सकाळी ड्रायव्हिग टेस्ट झाली की अवघ्या चार ते पाच तासात वाहन चालकाच्या हातात पक्कं लायसन्स मिळत आहे. आपला वेळ वाचावा म्हणून दलालांमार्फत लायसन्स काढण्यासाठी आपले खिसे रिकामे करावे लागतात. शिवाय अनेक खेटे घालत मनस्तापही सहन करावा लागतो. त्यामुळे कोल्हापुरकरांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. देशातील अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याची माहिती मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram