ब्रेकफास्ट न्यूज: कारगिल विजय दिनानिमित्त वीरचक्र विजेते नि.कर्नल गौतम खोत यांच्याशी बातचीत
Continues below advertisement
कारगिल युद्धाचे अनेक हिरोज आहेत. किंबहुना या युद्धात सहभागी झालेला प्रत्येक वीर जवान हा आपल्या देशाचा खराखुरा हिरो आहे. याच नायकांमधलं एक नाव आहे वीरचक्र विजेते रिटायर्ड कर्नल गौतम खोत.
-------------
५ जून १९९९ ला कर्नल खोत 'ऑपरेशन विजय'चा हिस्सा बनले. आर्मी एव्हिएशच्या टीमचे कर्नल खोत सदस्य होते. जखमी जवानांना हेलिकॉप्टरमधून बेस हॉस्पिटलमध्ये तातडीने पोहचवण्याची आणि जवानांपर्यंत साधनसामुग्री पोहचवण्याची जबाबदारी त्यांच्या टीमवर होती. १५ हजार फुटांच्या उंचीवरचं उड्डाण, तब्बल चाळीस दिवस आणि १०० तास या ऑपरेशनमध्ये सहभागी होत त्यांनी आणि त्यांच्या टीमने त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. हातात कोणतंही शस्त्र नसताना वॉर फ्रंटवर जात शौर्यानं परिस्थितीला सामोरं गेल्याबद्दल कर्नल गौतम खोत यांचा वीरचक्रानं सन्मान करण्यात आला.
कारगिल युद्धाच्या आठवणी, ऑपरेशन विजय दरम्यानचे त्यांचे अनुभव या गोष्टींवर बातचित करण्यासाठी वीरचक्र विजेते रिटायर्ड कर्नल गौतम खोत आज आपल्यासोबत आहेत