ब्रेकफास्ट न्यूज | ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज (5 सप्टेंबर) निधन झालं. पहाटे झोपेतच त्यांनी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्या 72 वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना उच्च रक्तदाब, मधुमेह देखील होता. त्यातच शुभांगी जोशी यांना मागील आठवड्यात शनिवारी पॅरालिलीसचा अटॅक आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. व्हेंटिलेटवर असलेल्या शुभांगी जोशी यांची आज पहाटे प्राणज्येत मालवली.