ब्रेकफास्ट न्यूज : विहिरीत पोहल्याने जळगावात तिघा मुलांना नग्न करुन मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात घडली आहे. 10 जून रोजी ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी गावात विहिरीत पोहल्यामुळे दोन मुलांची धिंड काढली आणि शेतातील खोलीत अमानुषपणे मारहाण झाल्याचं उजेडात आलं आहे. या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.