ब्रेकफास्ट न्यूज : जम्मू-काश्मीर : आयपीएस अधिकाऱ्याचा भाऊ बनला दहशतवादी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजम्मू कश्मीरमध्ये आयपीएस अधिकाऱ्याच्या भावानं दहशवादी बनला आहे. शमसुल हक मेंगनू असं या आयपीएस अधिकाऱ्याच्या भावाचं नाव आहे. शमसुल दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनमध्ये गेल्याचा दावा केला जात आहे.
हिजबुल मुजाहिद्दीनने शमसुलचा एक फोटो रविवारी जारी केला. या फोटोमध्ये शमसुल एक-47 रायफल दाखवताना दिसत आहे. शमसुल 22 मेपासून श्रीनगर विद्यापीठातून गायब झाला होता. कुटुंबाने त्याचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला.
रविवारी बुऱ्हाण वाणीच्या मृत्यू दिवसानिमित्त हिजबुलनं आपल्या नव्या साथीदारांची यादी आणि फोटो जारी केले. त्या यादीत शमसुलचा समावेश आहे.