ब्रेकफास्ट न्यूज : आणीबाणीविरोधात लढणाऱ्यांच्या कृतज्ञता सोहळ्यात पंतप्रधान मोदी सहभागी होणार
Continues below advertisement
आणाबाणीच्या काळाला शस्त्र बनवून पंतप्रधान मोदी विरोधकांवर निशाणा साधण्यासाठी सज्ज झाले आहेत. लोकशाहीसाठी काळा दिवस ठरलेल्या आणीबाणीला 43 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त खास पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीहून मुंबईला येणार आहेत. आणीबाणीविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आणीबाणीनिमित्तच्या एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. बिर्ला मातोश्री सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमात मोदी आणीबाणी आणि लोकशाही मुल्य या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होईल.
Continues below advertisement