ब्रेकफास्ट : एअर इंडियाची इमारत जेएनपीटीला विकण्याच्या हालचाली सुरू
Continues below advertisement
मुंबईतील एअर इंडियाची इमारत जेएनपीटीला विकण्याची तयारी सुरू आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता सरकारी सूत्रांनी व्यक्त केली. नरिमन पॉइंटमधील २३ मजली इमारत एअर इंडियाचे मुख्यालय होतं. मात्र काही दिवसांपूर्वी हे मुख्यालय नवी दिल्लीला हलवण्यात आलं आहे. त्यामुळं ही इमारत हलवण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती आहे. नागरी हवाई वाहतूक आणि जहाज मंत्रालयाच्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती एअर इंडियाचे मूल्य निश्चित करणार आहे. येत्या दीड वर्षांत ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे.
Continues below advertisement