ब्रेकफास्ट न्यूज | UPA चे घोटाळे, लांबलेल्या निर्णयामुळे NPA वाढला | रघुराम राजन
Continues below advertisement
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील बँकांच्या बुडीत कर्जाबाबत मोठं विधान केलं आहे. घोटाळ्यांच्या चौकशीत होणारा विलंब आणि लांबलेल्या निर्णयांमुळे बँकांचं बुडीत कर्ज अर्थात एनपीए वाढत गेला, असं राजन यांनी म्हटलं. भाजपचे ज्येष्ठ खासदार मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीने रघुराम राजन यांना पत्र लिहून समितीसमोर उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. त्यावर संसदीय समितीला एनपीएबाबत पाठवलेल्या उत्तरात रघुराम राजन यांनी यूपीए सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे.
Continues below advertisement