ब्रेकफास्ट न्यूज : अमरनाथमध्ये यंदा 12 फूट शिवलिंगाचं दर्शन
अमरनाथमधील प्रसिद्ध बाबा बर्फानी अर्थात शिवलिंगाच्या दर्शनाला सुरुवात झाली आहे. यावेळी 12 फूट शिवलिंग तयार झालं आहे. पंजाबच्या आठ भक्तांनी यंदाच्या वर्षीचं अमरनाथच्या शिवलिंगाचं पहिलं दर्शन घेतलं आहे. दरम्यान या वर्षी अमरनाथ भाविकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे.