ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना शेतमाल विकता येणार
Continues below advertisement
राज्यातल्या शेतकऱ्यांना आता मुंबईत थेट ग्राहकांना आपला शेतमाल विकता येणार आहे. यासाठी महापालिकेकडून शेतकऱ्यांना २५ ठिकाणी जागा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत भाजीपाला विकणाऱ्या शेतकऱ्यांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपला माल मंत्रालयाच्या आवारात टाकून आंदोलन केलं होतं. या घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी मनपा प्रशासनाला तातडीचे पावलं उचलण्याचे आदेश दिलं. यानंतर महापौर, मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. ज्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
Continues below advertisement