ब्रेकफास्ट न्यूज : देशभरातील डॉक्टर आज एकदिवसीय संपावर
Continues below advertisement
नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या विरोधात डॉक्टरांनी आज देशव्यापी संप पुकारला आहे. राष्ट्रीय वैद्यक परिषद बरखास्त करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोग स्थापण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या विधेयकाला देशभरातील डॉक्टरांकडून कडाडून विरोध केला जात आहे. विरोधकात सुधारणा कराव्यात या मागणीसाठी सहा महिन्यांपूर्वीही डॉक्टरांनी आंदोलन केले होते. आता हे विधेयक सभागृहात चर्चेसाठी ठेवण्यात येणार असल्याने डॉक्टरांनी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसले आहे. देशभरातील साधारण तीन लाख डॉक्टर्स या संपात सहभागी होणार असल्याचा अंदाज आहे.
Continues below advertisement