ब्रेकफास्ट न्यूज : काय आहेत समलैंगिकांच्या समस्या? टिनेश चोपडे यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
आपल्या आजूबाजूला असे काही विशेष घटक असतात ज्यांच्यासोबत कधी दिसण्यावरुन, वागण्यावरुन आणि सेक्शुअल प्रेफरन्सेसवरुनही भेदभाव होताना दिसतो. बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत आणखी एक ऐतिहासिक निर्णय आता सुप्रीम कोर्टाच्या दरबारी होणार आहे. तो म्हणजे भारतात समलैंगिक संबंध कायदेशीर आहेत की गुन्हा. समलैंगिक संबंध गुन्ह्याच्या चौकटीच्या बाहेर ठेवले जावेत म्हणून एक याचिका दाखल करण्यात आली आहे. दोन समलैंगी व्यक्तींनी शारीरिक संबंध ठेवण्यास मान्यता देणारा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने घेतला होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नाकारला होता.

यासंदर्भातील फेरयाचिकाही सुप्रीम कोर्टाने फेटाळली. आता पुन्हा एकदा आता क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या वतीनं तुषार मेहता बाजू मांडत आहेत. तर कलम 377 च्या विरोधात माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी बाजू मांडत आहेत. कलम 377 नुसार पुरुष, स्त्रीने समलिंगी व्यक्तीशी अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्यास जन्मठेप किंवा दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास व दंडाची शिक्षा आहे.

आता कायदेशीर दृष्ट्या याला मान्यता मिळते की नाही हा एक वेगळा मुद्दा झाला. पण मुळात आपल्या देशात समलैंगिकांच्या काय समस्या आहेत. या याचिकेमागचा हेतू काय आहे. त्यांच्या मागण्या काय आहेत या विषयी बोलण्यासाठी टिनेश चोपडे आपल्यासोबत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram