VIDEO | स्पीक फॉर इंडियाची विजेती मेघना अभ्यंकरशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आज आपल्यासोबत आहे खणखणीत वक्तृत्व लाभलेली एक कॉलेज युवती. तिचं नाव मेघना अभ्यंकर. मेघनाने कॉलेजातील मुला-मुलींना त्यांची मते मांडण्यासाठी व्यासपीठ देणारी 'स्पीक फॉर इंडिया' या स्पर्धेचं विजेतपद मिळवलंय. या स्पर्धेत राज्यभरातल्या १५०० पेक्षा अधिक कॉलेजातल्या जवळपास ४२ हजार मुलांमध्ये तिने प्रथम येण्याचा पराक्रम केलाय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते दिल लाखांचं पारितोषिक देऊन मेघनाचा गौरव करण्यात आला. आणि यावेळी तिच्या ओघवत्या वक्तृत्वशैलीचं मुख्यमंत्र्यांनीही मनापासून कौतुक केलं.
अंतिम फेरीत पोहोचलेल्या मेघना आणि हितेशला 'मीटु' या विषयावर आपली मतं मांडायची होती. या दोघांमधल्या वाद-विवादात मेघना अव्वल ठरली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola