VIDEO | जाहिरात विश्वात भरारी घेणाऱ्या सायली कुलकर्णीशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
काही दिवसांपूर्वी गाजलेली रस्ता सुरक्षेसंदर्भातली जाहिरात तुम्हाला नक्कीच आठवत असेल. ज्यात वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांना अक्षय कुमार क्या ये रोड तुम्हारे बार की है? असं खडसावून विचारतो. ही जाहिरात खूपच प्रभावी ठरली आणि हीटपण झाली. या जाहिराती मागे असलेल्या चेहऱ्यांमधला एक प्रमुख चेहरा आहे सायली कुलकर्णीचा. सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह सुरु आहे आणि सायलीचा निर्मिती सहभाग असलेल्या रस्ते सुरक्षा विषयक जाहिरातीला 'बेस्ट अॅडवर्टाइझिंग कॅम्पेन २०१८’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे अवघ्या पंचवीस वर्षांच्या सायली कुलकर्णी या मराठमोळ्या तरूणीने या जाहिरातीची संकल्पना साकारली आहे. या यशाबद्दल सायलीचं सध्या जाहिरातविश्वात खूप कौतुक होतंय. अॅडव्हर्टाझिंग या विषयात पदवी मिळवल्यावर सायलीनं या क्षेत्रात पाऊल ठेवलं.