ब्रेकफास्ट न्यूज : फिजिओथेरेपिस्ट कश्मिरा आंधळे यांच्याशी बातचीत

Continues below advertisement
नाशिकच्या फिजिओथेरिपिस्ट काश्मिरा आंधळे यांनी आपल्या कार्यातून स्वतःचं आणि देशाचं नावंही उज्ज्वल केलं आहे. युनायटेड किंग्डमच्या आरोग्यसेवेतील विशेष योगदानासाठी त्यांचा 'वाईंडरश-70' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला.

अठरा महिन्यांच्या दिव्यांग बालकांपासून तर जर्जर अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी कश्मिरा यांनी आजवर दिलेल्या अखंड सेवाकार्याचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला.

युकेमध्ये मधल्या 'नॅशनल हेल्थ स्कीम' च्या सत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त या पुरस्काराने पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. 'NHS'मध्ये दीर्घकाळ योगदान देणाऱ्या जगभरातील दहा देशातील सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. कश्मिरा या मूळच्या नाशिकच्या असून त्या 2003 सालापासून युकेत स्थायिक आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram