VIDEO | भवानी तलवारीची प्रतिकृती साकारणारे प्रा. नामदेवराव जाधव यांच्याशी गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची धार ज्या तलवारीने अनुभवली आहे त्या भवानी तलवारीची प्रतिकृती आता जगप्रदक्षिणा करण्यासाठी सज्ज झालीये.
ज्या तलवारीने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील अनेक पराक्रम पाहिले… ती तलवार म्हणजे भवानी तलवार… आज ही तलवार प्रत्यक्षात आपल्याकडे नाही, पण शिवभक्तांना ही तलवार पाहता यावी यासाठी इतिहास संशोधक प्रा. नामदेवराव जाधव यांनी या तलवारीची प्रतिकृती साकारली आहे…
शिवाजी महाराजांनी वापरलेल्या भवानी तलवारीप्रमाणेच ही तलवार साडेचार फूट लांबीची असून तिचे वजन 1200 ग्रॅम आहे. तीन तोळे सोने व पोलादामधील कमानी या धातूचा वापर करण्यात आला आहे. पुण्यातील सत्यजित वैद्य यांनी ही तलवार साकारलीये. या तलवारीचे ब्लेड स्टेनलेस धातूपासून तयार केलेले आहे. या धातूला दोनशे ते तीनशे वर्ष गंज लागत नाही. त्याचे आयुष्य मोठे आहे, त्याला धार चांगली असून ती कमाणी धातूपासून तयार करण्यात आली आहे. ही तलवार आहे. साडेचार फूट लांबीची असुन तलवार बनविण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी लागला.
6 फेब्रुवारीपासून जगभरात ‘भवानी तलवार दर्शन सोहळा’ करण्यात येणार आहे. या दिवशी ठाण्यातील दिवा येथे पहिला भवानी तलवार दर्शन सोहळा आहे. 1 ते 10 मे दरम्यान माॅरिशसमध्ये ही तलवार पाहता येईल.
आज या तलवारीचा इतिहास आणि तिच्या प्रतिकृतीविषयी बोलण्यासाठी स्वतः नामदेवराव जाधव सर आपल्यासोबत आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola