ब्रेकफास्ट न्यूज : 'चॅलेंज' नाटकाच्या धाडसी प्रयोगावर अभिनेत्री मुक्ता बर्वेशी गप्पा
Continues below advertisement
मराठी रंगभूमीवर सध्या एक धाडसी आणि वेगळा प्रयोग पाहायला मिळतोय. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मदनलाल धिंग्रा यांच्या आयुष्यावर बेतलेलं ‘चॅलेंज’ हे नाटक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं या उद्देशाने या नाटकाचे ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोग सध्या सुरु आहेत. 26 फेब्रुवारीपासून ‘चॅलेंज’ या नाटकाचे जवळजवळ 32 प्रयोग झाले. दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे काही प्रयोग ‘स्वेच्छा मूल्य’ या तत्त्वावर सादर केले जात आहेत.
या नाटकाचा दुसरा ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोग नुकताच शिवाजी मंदिर दादरला पार पडला. या नाटकाच्या पहिल्या ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोगाने 77 हजार रुपयांचा दुसऱ्या ‘स्वेच्छा मूल्य’प्रयोगाने 50 हजारांचा तर तिसऱ्या प्रयोगाने 60 हजारांचा चा गल्ला जमवला. याच प्रयोगाविषयी बोलण्यासाठी अभिनेत्री आणि निर्माती मुक्ता बर्वे आपल्यासोबत आहे.