VIDEO | आकाशवाणीच्या ज्येष्ठ वृत्तनिवेदिका मृदुला घोडकेंशी खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
रेडिओवरचं असंच एक व्यक्तीमत्व आपल्याबरोबर आहे. ज्य़ांनी १९८० नंतर वयाच्या अवघ्या २१-२२ व्या वर्षी दिल्लीमधलं आकाशवाणी केंद्र गाठलं. आणि अव्याहत ३५ वर्षांहूनही अधिक काळ श्रोत्यांना समृद्ध केलं. हे नाव आहे मृदुला घोडके यांचं. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रातून त्यांनी १९८० साली त्यांच्या करिअरची सुरुवात केली आणि २०१७ पर्यंत त्यांचा आवाज आपल्या घरातला एखादा सदस्य झाला होता. आज जागतिक रेडिओ दिनाच्यानिमित्ताने आपण त्यांच्याशी बातचित करुन, त्यांचा बातम्या देण्याचा अनुभव, त्यांचं करिअर, आणि त्यांच्या आठवणीमधील काही किस्से ऐकणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला पुन्हा एकदा या रेडिओच्या दुनियेत घेऊन जाण्याचा एक छोटा प्रयत्न करणार आहोत