VIDEO | बुलडाण्यात एक कोटींच्या बनावट नोटा जप्त | मोहेगाव, बुलडाणा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा
बुलडाणा जिल्ह्यातल्या मोहेंगावमध्ये 1 कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2 हजार, 500 आणि 200 च्या बनावट नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून उर्वरीत 3 ते 4 आरोपी फरार आहेत. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.