ब्रेकफास्ट न्यूज : एमपीएससी परीक्षेतील टॉपर्स रोहितकुमार, कल्पेशसोबत गप्पा
इच्छाशक्ती असेल तर कुठल्याही अडचणीवर मात करता येते, हे सिद्ध केलंय नुकत्याच एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या दोन विद्यार्थ्यांनी. एक आहे महाराष्ट्रातून पहिला आलेला रोहितकुमार राजपूत. मूळचा जळगावातील असलेल्या रोहितकुमारनं पुण्यातल्या COEP कॉलेजमधून कॉम्युटर सायन्समध्ये इंजिनियरिंग केलं. 2015 साली त्याने पहिल्यांदा राज्यसेवा परीक्षा दिली तेव्हा पहिल्याच प्रयत्नात त्याला यश मिळालं आणि मंत्रालयात कक्षाधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली होती. तर या परीक्षेत केवळ 21 व्या वर्षी कल्पेश जाधवनंही बाजी मारली आहे. राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमध्ये तो सर्वात कमी वयाचा उमेदवार आहे.