
ब्रेकफास्ट न्यूज : 'मंकी बात'च्या निमित्ताने ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांच्याशी खास बातचित
Continues below advertisement
नाटक असो वा सिनेमा एकदा चेहऱ्यावर रंग लागला की तो आयुष्यात कधी उतरत नाही असं म्हणलं जातं.. म्हणजेच रंगभूमीकडे एकदा स्वत ला झोकून दिलं की परतीचे मार्ग शोधावेसे वाटतच नाहीत असा त्याचा अर्थ.. कलाकाराला सर्वात महत्वाचं काय असतं तर ते त्याचं दिसणं.. आणि कलाकाराच्या चेहऱ्यावरचं काय दाखवायचं आणि काय लवपायचं हे ज्याच्या हातात असतं तो म्हणजे रंगभूषाकार..आनंद, दुख, राग, भिती अशा कोणत्याही भावना कलाकाराच्या मनात असल्या तरी त्याच्या चेहऱ्यावर काय दिसावं हे ज्याच्या नजरेला अगदी अचूक कळतं ते ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे आज आपल्यासोबत आहेत..
Continues below advertisement