ब्रेकफास्ट न्यूज : संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते अभिराम भडकमकर यांच्याशी बातचित
संगीत नाट्यभूमी गाजवणाऱ्या आपल्या मोहित करणाऱ्या सूरांनी संगीत रंगभूमीवर इतिहास घडवणारे श्रेष्ठ कलाकार बालगंधर्वाचा जीवनपट आता हिंदी भाषेतुनही उलडगणार आहे. अभिराम भडकमकर लिखीत असा हा बालगंधर्व या पुस्तकाचा हिंदी अनुवाद असलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा १६ जुलैला दिल्लीत पार पडेल. बालगंधर्व ही कांदबरी २०१२ साली प्रकाशित झाली होती. आता हिंदीतील नामवंत प्रकाशनसंस्था राजकमलने या पुस्तकाचा अनुवाद करण्याचं ठरवलं आणि पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या गोरख थोरात यांनी अनुवादाची जबाबदारी उचलली. नुकत्याच पार पडलेल्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार, आणि जेष्ठ रंगकर्मी रामगोपाल बजाज यांच्याहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन होईल तर खासदार विनय सहस्त्रबुद्धे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.