ब्रेकफास्ट न्यूज : मुख्य सचिवपदी डी के जैन यांच्या नियुक्तीनंतर अधिकारी नाराज
Continues below advertisement
सेवाजेष्ठतेचा क्रम नाकारुन राज्याच्या मुख्यसचिवपदी डी. के. जैन यांची मुख्यमंत्र्यांनी नियुक्ती केलीय. त्यानंतर आता अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. त्यामुळे मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त सचिव मेधा गाडगीळ एका महिन्याच्या दीर्घ रजेवर गेल्या आहेत. खरंतर डी के जैन यांच्यापेक्षा मेधा गाडगीळ आणि गृहविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव हे ज्येष्ठ अधिकारी होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना डावलून डी. के. जैन यांच्या नावाला पसंदी दिली होती. त्यानंतर आता अधिकारी वर्गात नाराजी आहे. गाडगीळ पाठोपाठ सुधीरकुमारही चार दिवसांच्या रजेवर गेलेत. तेही नाराज असल्याची चर्चा आहे.
Continues below advertisement