ब्रेकफास्ट न्यूज : राज्य शासनाची 72 हजार पदांची नोकरभरती केवळ तात्पुरत्या स्वरुपाची

Continues below advertisement
दोन वर्षात 72 हजार सरकारी पदं भरण्याची घोषणा करुन स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या फडणवीस सरकारनं घोर फसवणूक केल्याचं समोर आलंय.
कारण ही सगळी पदं तात्पुरत्या स्वरुपाची असून केवळ 5 वर्षांसाठीच त्यांची नेमणूक होणार आहे.
अध्यादेशात त्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या कालावधीत कामगारांना पूर्ण वेतनही दिले जाणार नाहीए.
सरकारच्या अध्यादेशानं ही बाब समोर आल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाचा निषेध केलाय.
अशा नोकरभरतीने बेरोजगारीची टांगती तलवार कायम असणार आहे, तर कामाचा निपटारा होण्याचीही शक्यता नसल्याचं संघटनेचं मत आहे.
त्यामुळे गेले दोन दिवस बेरोजगार तरुणांमध्ये असलेल्या उत्साहावर पाणी पडलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram