ब्रेकफास्ट न्यूज : येडियुरप्पांविरोधात काँग्रेस आणि जेडीएस सुप्रीम कोर्टात

Continues below advertisement
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर 24 तासात कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांना सरकार वाचवण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार आहे.
कारण काँग्रेस आणि जेडीएसनं येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी पाचारण करणं असंवैधानिक असल्याचा आरोप केलाय.
त्यामुळे आता सुप्रीम कोर्टानं येडियुरप्पा सरकारकडून समर्थक आमदारांची यादी मागवली आहे.
सकाळी दहा वाजता न्या. ए.के.सिक्री, एस.ए.बोबडे आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.
दरम्यान भाजपकडून फोडाफोडीचं राजकारण होऊ नये यासाठी काँग्रेस आणि जेडीएसनं आपल्या आमदारांना बसनं हैद्राबादकडे रवाना केलंय.
मात्र अद्यापही काँग्रेसच्या 4 बेपत्ता आमदारांचा ठावठिकाणा लागलेला नाही.
भाजपनं कर्नाटकात 104 जागा जिंकल्यात. आणि त्यांना बहुमतासाठी आणखी 8 आमदारांची गरज आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram