VIDEO | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. उद्या मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. दरम्यान अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सकाळी 11 वाजता राष्ट्रपती कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहात भाषण करतील. 13 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू राहील..सकाळी साडे नऊला राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान अरूण जेटली कॅन्सरच्या उपचारांसाठी परदेशी असल्यानं अर्थमंत्री पियुष गोयल अर्थसंकल्प मांडण्याची शक्यता आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola