ब्रेकफास्ट न्यूज : आंध्र प्रदेशात बोट उलटून 23 जण बुडाले, 17 जणांना वाचवलं
Continues below advertisement
आंध्रप्रदेशमधल्या राजमुंद्री येथे गोदावरी नदीत बोट उलटून 23 प्रवासी बुडाल्याची घटना घडलीय...बुडालेल्या लोकांना वाचवण्यासाठी डोरनिअर विमानांसह पाणबुड्यांचे पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. त्याचबरोबर २ हेलिकॉप्टर्ससह प्रशासनाकडून अतिरिक्त पाणबुड्यांचे पथक पाठवण्यात येणार आहे. आज सकाळी हे पथक बचावकार्य सुरु करणार आहे.
या घटनेतील नागरिकांना वाचवण्यासाठी बचाव पथकाचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या होडीतून प्रवास करणाऱ्या एकूण ४० जणांपैकी अनेक जण बेपत्ता झाले आहेत. तर १७ लोकांना वाचवण्यात यश आले आहे.