ब्रेकफास्ट न्यूज : कपिल देव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
Continues below advertisement
भारताच्या पहिल्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार, माजी क्रिकेटपटू कपिल देव राजकारणात प्रवेश करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला. याचं कारण म्हणजे कपिल देव यांच्या निवासस्थानी भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी लावलेली हजेरी. अमित शाहांनी शुक्रवारी रात्री कपिल देव यांच्या घरी घेतलेल्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कपिल देव भाजपचा झेंडा खांद्यावर घेणार का, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र कपिल देव यांनी या शक्यता नाकारल्या आहेत.
Continues below advertisement