ब्रेकफास्ट न्यूज : उच्च शिक्षण विभागाकडून प्राचार्यांना भगवद्गीता वाटपाचे आदेश

Continues below advertisement
भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार आता विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं उच्च शिक्षण विभागानं ठरवलेलं दिसत आहे. कारण याबाबत एक परिपत्रक उच्च शिक्षण विभागानं काढलं आहे. मुंबई आणि मुंबई उपनगरातील ज्या महाविद्यालयांना नॅकच्या मूल्यांकनामध्ये A किंवा A+ श्रेणी मिळाली आहे, अशा 100 महाविद्यालयांमध्ये भगवद्गीतेचं वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक महाविद्यालयात भगवद्गीतेचं 100 संच वाटप करण्याचे आदेश प्राचार्यांना देण्यात आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram