ब्रेकफास्ट न्यूज: ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली, बारवी धरण आव्हरफ्लो
Continues below advertisement
ठाणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारं बदलापूरमधलं बारवी धरणं १०० टक्के भरलं आहे. धरणक्षेत्रात गेल्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळं दरवर्षीच्या तुलनेतर यंदा हे धरण तब्बल दीड महिनाआधीच भरलंय. या धरणातून ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरला पाणीपुरवठा होतो. त्यामुळं ठाणेकरांची पाण्याची चिंता आता मिटली आहे.
Continues below advertisement