ब्रेकफास्ट न्यूज : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर
Continues below advertisement
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्स रुग्णालयातल्या डॉक्टरांनी दिलीए.. मात्र अजूनही वाजपेयींवर उपचार सुरु आहेत..वाजपेयींना मूत्रसंसर्ग झाला. त्यांना आज दुपारी किंवा रात्री डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एम्स रुग्णालयानं मेडिकल बुलेटीन काढून माहिती दिली आहे. दरम्यान वाजपेयींच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्य़क्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी एम्समध्ये वाजपेयींची भेट घेतली. पंतप्रधान मोदी जवळपास 55 मिनिटे एम्समध्ये होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही अटलजींच्या जावयांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली...यावेळी एम्स रुग्णालयाबाहेरील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
Continues below advertisement