ब्रेकफास्ट न्यूज : 'कसा मी... असा मी...' पुस्तकानिमित्त ज्येष्ठ लेखिका अरुणा ढेरे यांच्याशी गप्पा
Continues below advertisement
महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पु.ल. देशपांडे यांची आज पुण्यातिथी... पु.लं. देशपांडे यांच्या कथा आपल्याला आपल्याशा वाटतात.. अगदी आपल्या घरातीलच कोणती तरी व्यक्ती पु ल यांनी पाहिली असावी आणि मग ती आपल्या लेखातून रंगवली असावी इतकं पु ल यांचं लिखाण लाघवी, मिश्किल, सरळ-साधं आहे.. आणि म्हणूनच लिहायला कठिणही.
पण पु ल देशपांडे यांचे असे अनेक लेख आहेत जे कधी प्रकाशित झाले नाहीत.ते लेख "कसा मी, असा मी " या नव्या पुस्तकातून समोर येत आहेत. त्यातून पुल यांनी मांडलेले विचार फक्त त्यांच्यातील विनोदी लेखकाचं दर्शन घडवत नाहीत तर त्या वेळेसच्या सामाजिक स्थितीवर मार्मिक भाष्य करतात. तर अनेक लेखांतून बालगंधर्व, रविंद्रनाथ टागोर यांच्यासारखे थोर कलाकार,लेखक आपल्याला पुलंच्या शैलीत उलगडतात.